कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला मध्ये आपले स्वागत आहे

    येवला कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना मुंबई राजपत्र क्रं. १०५५५/दि. १२/३/१९५५ अन्वये झाली असुन संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज दि. १५/९/१९५७ पासुन सुरु झालेले आहे.संपुर्ण येवला तालुका हे बाजार समितीचे कार्यक्षेत्र असुन येवला येथील नगर-मनमाड रोडलगत सि. सर्वे नं. ११७/२ या १० हेक्टर स्वः मालकीचे जागेमध्ये संस्थेचे मुख्य मार्केट यार्ड आहे. दिवसेंदिवस येवला मुख्य आवारात कांदा, कापुस, मका व भुसारधान्य, टोमॅटो व सर्व प्रकारचा भाजीपाला तसेच इतर शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यासाठी लागणा-या आवश्यक सोयी सुविधा बाजार समितीमार्फत पुरविण्यात येत आहे.

    तसेच उपबाजार अंदरसूल येथे गावाचे पुर्वेस व पश्चिमेस अशी दोन्ही मिळुन ४ हेक्टर १० आर जागा संस्थेच्या स्वः मालकीची आहे. सदरची जागा दोन ठिकाणी असुन गट नं. १३८ ते १४० या ४ एकर ७ आर जागेत कांदा लिलाव होतो. व गट नं. ७३५ / १ (अ) या ६ एकर ३ आर जागेत बाजार समितीमार्फत केंद्र शासनाच्या टी. एम. सी. योजनेअंतर्गत कॉटन मार्केट विकसीत करण्यात आले आहे. उर्वरीत जागेत मका व भुसारधान्याचे लिलाव होतात. तसेच सदर ठिकाणी १००० मे. टन क्षमतेचे २ गोदाम बांधण्यात आलेले आहेत.

    सविस्तर पहा

दैनंदिन दर पहा

शेतमाल दिनांक किमान दर कमाल दर सरासरी दर
कांदा 2025-06-28 251 1482 867
मका 2025-06-28 2052 2325 2189
सोयाबीन 2025-06-28 3900 4240 4070
गहू 2025-06-28 2525 2600 2563
बाजरी 2025-06-28 2010 2599 2305
हरभरा 2025-06-28 3949 3949 3949
तुर 2025-06-28 5000 5450 5225

येवला बाजार समिती

मुख्य कार्यालय येवला

मुख्य प्रवेशव्दार येवला

उपबाजार पाटोदा

उपबाजार अंदरसुल कार्यालय